रक्षाबंधनानिमित्त माहेरी आलेल्या तरुण विवाहितेने घेतला गळफास ; तीन महिन्यापूर्वीच झाला होता विवाह

ऑगस्ट 13, 2022 1:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२२ । पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे रक्षाबंधनानिमित्त आलेल्या तरुण विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. उमा नानू फादगे (वय – २०) असे या मृत विवाहितेचे नाव असून तीन महिण्यापुर्वीच तिचे लग्न झाले होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

shevale women succied

काय आहे नेमकी घटना?
शेवाळे येथील नानू शिवदास फादगे यांची एकुलती एक कन्या उमा फादगे हिचा विवाह खंडेराव नगर, जळगांव येथील रहिवाशी सनी प्रेमनाथ उमप यांच्याशी शेवाळे येथे दि. १८ मे २०२२ रोजी मोठ्या थाटात पार पडला. दरम्यान, रक्षाबंधन सणासाठी आपल्या दोन भावंडांना राखी बांधण्यासाठी यावे म्हणून दि. १२ ऑगस्ट रोजी उमा हिचे वडिल नानू फादगे हे उमाला माहेरी घेऊन आले होते.

याच दिवशी रात्री उमा ही गावात वास्तव्यास असलेली तिची मावशी शिलाबाई सोमनाथ गायकवाड यांच्या घरी झोपण्यासाठी गेली होती. आज शनिवारी रोजी उमा आपल्या घरी आल्यानंतर मला आंघोळीसाठी जायचे आहे असे सांगुन घरातील स्नानगृहाकडे गेली. दरम्यान बराच वेळ होवुन सुद्धा उमा येत नसल्याने वडिल नानू फादगे यांनी घरात शोध घेतला असता घरातील स्वयंपाक घरात उमा ही दोरीच्या सहाय्याने फाशी घेतलेल्या अवस्थेत वडिलांना आढळुन आली.

दरम्यान, ग्रामस्थांच्या मदतीने उमा हिस पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी उमा हिस मृत घोषित केले. उमा सनी उमप या विवाहितेने आत्महत्या का केली ? यांचे कारण मात्र अद्याप समजु शकले नाही. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस काॅन्स्टेबल राकेश खोंडे हे करित आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now