वरणगावात मोबाईल तुटल्यावरून तरुणाचे डोके फोडले!

जुलै 10, 2022 1:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । मोबाईल तुटल्याने त्याची भरपाई देण्यास नकार दिल्याने तरुणाच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारून दुखापत करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी एकाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

crime 2022 07 10T132917.331 jpg webp

तक्रारदार शुभम रमेश भोई (25, भोईवाडा, वरणगाव) याने संशयीत आरोपी कुणाल कोळी व त्याची पत्नी (पूर्ण नाव माहित नाही) यांचा तुटलेला मोबाईल भरून देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने आरोपी कुणालने लोखंडी वस्तू डोक्यावर मारून दुखापत केली. ही घटना गुरुवार, 7 रोजी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास घडली तर आरोपीच्या पत्नीने शिविगाळ केली. तपास हवालदार मुकेश जाधव करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now