जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२१ । जिल्ह्यात आत्महत्याचे प्रमाण वाढतच आहे. अशातच जळगाव शहरातील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. समीर रामदास बांदल (रा. शिवाजीनगर हुडको) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येमागील कारण अद्यापही कळू शकले नाही. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, शिवाजी नगरात राहणाऱ्या समीर बांदल याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या दीड महिन्यांपुर्वीच समीर हा पुण्याला नोकरी लागली होती. मंगळवारी १८ जानेवारी रोजी समीरच्या घरी गोंधळाचा कार्यक्रम असल्याने तो जळगावात घरी आला होता. दरम्यान २० जानेवारी रोजी सायंकाळ ८ वाजेच्या सुमारास समीर घरी एकटा असतांना त्याने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

समीरचे वडील रामदास बांदल हे कामावरून घरी आल्याने हा प्रकार उघडकीला आला आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजून आले नाही. समीरची पत्नी माहेरी गेलेल्या होत्या. नातेवाईक विजय लक्ष्मण बांदल यांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक ललीत भदाणे करीत आहे.
हे देखील वाचा :
- गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणेशोत्सव स्पर्धांतून संस्कृतीचा जागर
- सराफा बाजारात शनिवारी मोठी तेजी! सोने-चांदीत तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ?
- जळगाव रेल्वे स्थानकावरील कामाचा फटका; १२ गाड्या रद्द, अनेकांच्या वेळेत बदल
- मुंबईत लालबागच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या तरुण अभियंत्याचा मृत्यू
- बांभोरी पुलावरून महिलेने घेतली गिरणा नदीत उडी; शोधमोहीम सुरू !










