⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

बियर प्यायल्यानंतर तरुणाला झाल्या उलट्या, बाटलीवर बघितले तर.. पुढे काय झालं वाचा..

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२२ । तुम्हीही जर बिअरचे (Beer) शौकीन असाल तर ही बातमी तुम्ही नक्कीच वाचली पाहिजे. बऱ्याच जणांना बिअर पिण्याचे व्यसन असते. काही जणांना बिअरचे जास्त सेवन केल्याने उलट्या होऊ शकतात. मात्र, आता जळगाव शहरात काहीसा वेगळाच प्रकार समोर आला आहे. त्यामुळे उत्पादक शुल्क विभागाला संबंधित वाईनवरच कारवाई करावी लागली.

नेमका काय आहे प्रकार?
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात अशोक किराणा जवळ राज वाईन नावाचे वाईन शॉप आहे. याठिकाणी काही तरुण दुपारी बियर पीत होते. त्यातील एका तरुणाला बियर प्यायल्यानंतर उलटी झाली. त्यानंतर त्यांनी बियरच्या बाटलीवर बघितले तर ती मुदतबाह्य झालेली होती. त्यांनी लागलीच याची तक्रार केली.

तरुणांच्या तक्रारीनंतर उत्पादक शुल्क विभागाने संबंधित जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील राज वाईनवर कारवाई केली आहे. या कारवाईत दुकानात अमस्टल बिअरच्या १२४ बाटल्या आणि ५०० एम.एल.चे १० टीन मुदतबाह्य असल्याचे आढळून आले असून हा माल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईने खळबळ उडाली आहे

भरारी पथकाने पंचनामा करत या बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे आरोपपत्र पाठवणार असल्याची माहिती भरारी पथकातील सी.एच. पाटील यांनी दिली आहे.