⁠ 
गुरूवार, मे 23, 2024

नाथाभाऊंची भाजपमध्ये घरवापसी ; थोड्याच वेळात प्रवेश सोहळा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | 6 मार्च 2024 | राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत नाथाभाऊ यांनी घरवापसी केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायराल झाला आहे. दरम्यान मुंबई येथे औपचारिक प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

खडसे एकेकाळी भाजपचे हेविवेट नेते मानले जाते होते. खान्देश व महाराष्ट्रात भाजपा वाढीमध्ये खडसे यांचा मोठा वाटा होता. मात्र मध्यंतरी त्यांचे पक्षासोबत बिनसले, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले. त्यानंतर त्यांनी भाजपला राम राम करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
मधल्या काळामध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करणार असे चर्चांना जोर धरला होता.
अखेर त्यांनी आज संध्याकाळी भाजपमध्ये प्रवेश केला आहे

137 कोटीच्या गैण खनिज प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या वर व परिवारावर आरोप झाले होते त्यानंतर या प्रकरणाला स्थगिती देण्यात आली होती या प्रकरणाला स्थगिती देण्यात आली असून त्यांच्या सून रक्षा खडसे यांनाही भाजपने रावेर लोकसभेची उमेदवारी दिली असून
तीन ते चार दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी दिल्लीमध्ये जाऊन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या होत्या आज ते अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे.