जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । यावल तालुक्यातील वाघोदा येथील ३५ वर्षीय तरुणाने सुसाइड नाेट लिहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आलीय. जगदीश हिरामण पाटील असे मृताचे नाव आहे. दरम्यान या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून याबाबत यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

काय आहे नेमकी घटना?
वाघोदा येथील जगदीश हिरामण पाटील हा सकाळी शेती कामाला जाताे, असे सांगून घरून निघाला. मात्र सायंकाळ झाली तरी तो घरी परत आला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेतला असता साकळी शेती शिवारातून जाणाऱ्या पाटचारीजवळ जगदीश पाटील हा गळफास घेऊन मृतावस्थेत आढळला.

दरम्यान, जगदीश पाटील याने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली हाेती. त्यात त्याने म्हटले आहे की, मी माझ्या वैयक्तिक आयुष्याला कंटाळून आत्महत्या करत आहे. तरी माझ्या आत्महत्येशी कुणाचा काही एक संबंध नाही. तरी कुणाला त्रास होईल, असे वागू नये, ही विनंती. असा मजकूर या सुसाईड नाेटमध्ये लिहिल्याचे आढळले.

या प्रकरणी नितीन पाटील यांच्या खबरीवरून यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत जगदीश याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार असून त्याच्या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त हाेत आहे
हे देखील वाचा :
- जळगावात एफडीएची धडक कारवाई ! ५ हॉटेलचे परवाने निलंबित, ३८ लाखांचा गुटखा जप्त
- जळगाव शहर पोलिसांची चोरीच्या गुन्ह्याचा छडा; तीन आरोपी अटकेत, १० हजारांची रोकड जप्त
- मुक्ताईनगरातील ट्रॅव्हल्समधील डिझेल चोरीचा उलगडा, भिवंडीतील दोन आरोपी जेरबंद
- चाळीसगाव लैंगिक अत्याचार प्रकरण; आरोपीला 20 वर्षांचा सश्रम कारावास
- चोपडा हादरले! जन्मदात्या बापाचा दोन मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर










