जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२२ । तरुणीकडून लग्नासाठी वारंवार होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय तरुणाने पुर्णा नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. अजय सिताराम इंगळे (वय-२५, रा.उंचदा, ता. मुक्ताईनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी तरूणीवर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमकी घटना?
अजय सिताराम इंगळे हा मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच्या गावातील २८ वर्षीय तरूणी गेल्या काही महिन्यांपासून तिच्याशी लग्न करावे अशी मागणी करत होती. मात्र, या लग्नास अजय याने नकार दिला होता. लग्नासाठी वारंवार होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून अजयने ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास खामखेडा पुलाच्या पुर्णा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयताच्या भाऊ मनोज इंगळे यांच्या फिर्यादीवरून तरूणीवर मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे करीत आहे.
हे देखील वाचा :
- जळगावातील निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वाची सूचना; तात्काळ KYC पूर्ण करा, अन्यथा..
- पारोळ्यातील बाधित भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटलांसह जलसंपदा मंत्र्यांनी केली पाहणी
- अनुसूचित जाती व नवबौद्ध बचतगटांसाठी खुशखबर; मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार ९० टक्के अनुदान
- जळगावात एफडीएची धडक कारवाई ! ५ हॉटेलचे परवाने निलंबित, ३८ लाखांचा गुटखा जप्त
- भुसावळमार्गे धावणार मुंबई–दानापूर एकेरी विशेष ट्रेन










