पाचोरा हादरले ! गोळीबार करून तरुणाची निर्घृण हत्या

जुलै 4, 2025 10:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२५ । पाचोरा शहरातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. ज्यात अज्ञात मारेकऱ्यांनी 26 वर्षीय तरुणावर गोळीबार केलं त्याचा जागीच मृत्यू झाला. आकाश कैलास मोरे (वय २६, रा. छत्रपती शिवाजी नगर, पाचोरा) असं गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली. दरम्यान मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहे.

Untitled design 6 jpg webp

याबाबत असे की, पाचोरा शहरात असलेल्या बस स्थानक परिसरात आज संध्याकाळी दोन संशयित मारेकरी दुचाकीवरून आले आणि त्यांनी आकाश मोरेवर सिनेस्टाईल गोळ्या झाडल्या. नंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले. यावेळेला नागरिकांची धावपळ उडाली. पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेऊन जागा सील केली. त्यांनी तात्काळ पंचनामा करून आकाश मोरेला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलवलं. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. शहरात नाकाबंदी सुरू असून मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून हत्याचे नेमकं कारण काय ते अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक लॅबला घटनेची माहिती दिल्याने फॉरेन्सिक व्हॅन देखील घटनास्थळी दाखल झालेली आहे. पाचोरा पोलिसांनी गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे. घटनेत तब्बल १० ते १२ राउंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. शांत असलेल्या पाचोरा शहरात गुन्हेगारीची भयंकर घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now