---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

Jalgaon : अश्लील फोटो काढून मुलीकडे शरीर संबंधांची मागणी ; तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२५ । नाव बदलून मुलीशी मैत्री केली आणि तिचे अश्लील फोटो काढून तिच्याकडे शरीर संबंधांची मागणी करणाऱ्या आयान शे. नूर मोहम्मद (वय 19 वर्षे, रा.शिवाजीनगर रोड, गेंदालाल मिल जळगाव) याच्या विरुद्ध पीडित मुलीने तक्रार केली. यानंतर या आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

New Project 5

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नूर मोहम्मद याने फिर्यादीच्या बाल मनाचा फायदा घेवून तिच्याशी गोड बोलून आधी विशाल शर्मा असे नाव सांगून फिर्यादीशी मैत्री केली. त्यानंतर 22 डिसेंबर 2024 रोजी व 2025 मधील जानेवारी मध्ये एका दिवशी जळगांव शहरातील हनुमान मंदीर जवळ तिच्या मनाविरुध्द किस करतानाचे फोटो काढून ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

---Advertisement---

त्यानंतर 26 मार्च 2025 रोजी जळगाव शहरातील वहीनाबाई गार्डन मध्ये पीडित मुलीच्या अंगाला व कंबरेला पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला व तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी करुन आई वडीलांना व तिला मारुन टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आयान शे. नूर मोहम्मद (वय 19 वर्षे, रा.शिवाजीनगर रोड, गेंदालाल मिल जळगाव) यास 28 रोजी अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एस आर झवर/भागडिया यांनी 2 दिवस पोलीस कस्टडी दिली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment