दुर्दैवी : सर्पदंश झाल्याने तरुण शेतकरी दगावला, पाचोरा तालुक्यातील घटना

ऑगस्ट 6, 2023 4:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२३ । सर्पदंश झाल्याने एका २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी पाचोरा तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथे घडलीय. मंथन राजेंद्र पाटील (वय – २३) असं मृत तरुणाचे नाव असून याबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

khedgaon news jpg webp

नेमकी घटना काय?
मंथन हा आज सकाळी शेतात कामानिमित्त गेला होता. दरम्यान सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतात काम करत असतांना मंथन यास एका विषारी जातीच्या सर्पाने दंश केला. सदरचा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच मंथन यास रुग्णवाहिका चालक निळु पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मंथन यास मृत घोषित केले.

घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत मंथन पाटील याचे पाश्चात्य आई, वडिल, एक बहिण असा परिवार असुन अतिशय होतकरू व मनमिळाऊ स्वभावाचा मंथन पाटील याचे अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now