जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । यावल शहरातील केसरी-नंदन बहुउद्देशीय संस्था व श्री हनुमान व्यायाम शाळेने शुक्रवारी भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित केली आहे. सायंकाळी ४ वाजता श्री महर्षी व्यास मंदिराजवळ ही दंगल होईल.
कुस्त्याच्या या सामन्यांची सुरुवात आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, माजी नगराध्यक्ष अनुक्रमे अतुल पाटील, शशांक देशपांडे, राकेश कोलते, माजी उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले, डॉ.कुंदन फेगडे, अभिमन्यू चौधरी, दीपक बेहेडे, शरद कोळी, कमल घारू, योगेश मांडे, डॉ. युवराज चौधरी, गणेश महाजन, दिलीप वाणी, तुकाराम बारी, सुधाकर धनगर, उमेश फेगडे, सय्यद युनूस, डॉ.नीलेश गडे, अताउल्ला खान उपस्थित राहतील. या कुस्ती स्पर्धेत धुळे, मालेगाव, जळगाव, औरंगाबाद व बऱ्हाणपूर येथील नामवंत पहिलवान सहभागी होणार आहेत.