बातम्यामहाराष्ट्र

लाल मातीतच पैलवानाने घेतला जगाचा निरोप ; पैलवान स्वप्निल पाडाळेचे निधन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | ९ मार्च २०२३ | मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातील पैलवान स्वप्निल ज्ञानेश्वर पाडाळे (महाराष्ट्र चॅम्पियन) याचे बुधवारी कुस्तीच्या तालमीत आकस्मित निधन झाले. सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पुण्यातील मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत ही दुर्दैवी घटना घडली. (Wrestler Swapnil Padale passed away)

स्वप्निल हा नेहमी प्रमाणे सरावासाठी मारुंजी या ठिकाणी असलेल्या कुस्तीच्या तालमीत आला होता. कुस्तीसाठी सराव करताना पैलवानांना सपाट्या मारायच्या असल्यामुळे स्वप्नील देखील व्यायाम करत होता. व्यायाम करताना अचानक स्वप्नीलला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि अचानक तो खाली कोसळला. अचानक खाली पडल्याचे पाहताच तालमितील इतर जणांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

स्वप्नीलने पुण्यातील कात्रज परिसरात असणाऱ्या मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेतले होते. तसेच कात्रज येथे नुकत्याच झालेल्या एन. आय.एस. कुस्ती कोच परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. तसेच तो शे ३९;महाराष्ट्र चॅम्पियन ३९; देखील अ होता. सद्या तो सर्व पैलवानांना लग कुस्तीचे प्रशिक्षण देण्याचे काम करत होता.

Related Articles

Back to top button