तेलंगणातील खून प्रकरणातील फरार आरोपीला जळगावमधून ठोकल्या बेड्या

मे 19, 2025 3:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२५ ।  तेलंगणा राज्यातील खून प्रकरणातील फरार आरोपीला जळगावमध्ये बेड्या ठोकण्यात आले. अझहर निजाम खाटीक (रा. जळगाव) असं आरोपीचे नाव असून त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी चंदानगर पोलीस स्टेशन, सायबराबाद (तेलंगणा) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

kulbhushanpatil firing case arrest

या घटनेबाबत असे की, तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस आयुक्तालयाच्या चंदानगर पोलीस ठाणे हद्दीत खुनाची घटना घडली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अझहर निजाम खाटीक (रा. जळगाव) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. दरम्यान, आरोपीच्या शोधासाठी चंदानगर पोलीस ठाण्याचे पथक जळगाव जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन संपूर्ण माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले.

स्थानीय गुन्हे शाखेतील विजयसिंग पाटील आणि अक्रम शेख यांच्या पथकाने मेहरूण परिसरात सापळा रचून रविवार (दि.18) रोजी रात्री सुमारे 11.30 वाजता अझहर निजाम खाटीक याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी चंदानगर पोलीस स्टेशन, सायबराबाद (तेलंगणा) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment