हा तर बालिशपणा.. ; अमित ठाकरेंच्या ‘त्या’ पत्रावर मंत्री गिरीश महाजनांची खोचक टीका

मे 19, 2025 6:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२५ । मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. युद्धाचा निकाल अद्याप स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा, थोडा संयम बाळगावा, युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजय रॅली ज्या निघत आहेत त्या टाळाव्या अशी त्यांनी केली. दरम्यान अमित ठाकरे यांच्या या पत्रावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी खोचक टोला लगावला आहे.

girish mahajan amit thakre

नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?
अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेलं पत्र प्रसिद्धीसाठीचे पत्र असून हा बालिशपणा आहे. संपूर्ण देशाने आणि जगाने बघितले आपण काय केलं म्हणून? तुम्हाला त्याबाबतही काही शंका आहे का? असा सवाल यावेळी गिरीश महाजन यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, संपूर्ण जगाने पाहिले, आमच्या सैन्याने काय केलं आणि तुम्हाला आता काय त्याचा रिझल्ट पाहिजे, संपूर्ण बालिशपणा चालला आहे हा, प्रसिद्धीसाठी असे पत्र लोक का लिहितात? मला काही कळत नाही, असं पत्र लिहिण्याची काहीच आवश्यकता नाहीये, असा टोला यावेळी महाजन यांनी अमित ठाकरे यांना लगावला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment