
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय आणि महादेव रूग्णालय येथे विजयादशमी उत्सवानिमित्त शस्त्र व साहीत्य पूजन माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शस्त्रपूजनानंतर उपस्तितांनी विजयादशमीचा सण उत्साहात साजरा केला.
विजयादशमीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात शस्त्र व साहित्य पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बायोमेडीकल विभागात गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, विभागप्रमुख विजय चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर महादेव हॉस्पीटल येथे देखील आरोग्य देवता धन्वंतरी आणि वैद्यकीय उपकरणांचे पूजन डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रा. डॉ. दीपक झांबरे यांच्या हस्ते यंत्र साहीत्यांचे पूजन करण्यात आले. तसेच गोदावरी संगीत महाविद्यालय येथे सप्तसूरांची साथ देणार्या वाद्यांचे प्राचार्या पद्मजा नेवे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. विविध संस्थांमध्ये पार पडलेल्या या पूजन सोहळ्यांतून विजयादशमीच्या निमित्ताने आपल्या कार्यसाधनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.





