
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात आदिशक्तीची आराधना
जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी परिषदेतर्फे महाविद्यालयाच्या प्रांगणावर नवरात्रौत्सवानिमित्त गरबा नाईट २०२६ मध्ये दांडीया उत्सवाच्या माध्यमातून आदिशक्तीची आराधना करण्यात आली.
गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी परिषदेतर्फे दांडीयाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी फाउंडेशन अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, हृदयालयाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. माया आर्विकर हे उपस्थित होते. सुरूवातीला मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर आदिशक्ती मातेची मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात येऊन गरबा नाईटला सुरूवात करण्यात आली. या उत्सवात २०२१ ते २०२६ च्या बॅचमधील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. डीजेच्या तालावर गरबा नाईटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दांडीयाचा मनमुराद आनंद लुटला. तसेच आदिशक्ती मातेचा जागर करीत नवरात्रौत्सवाचा उत्साह सर्वत्र दिसून आला. या उत्सवादरम्यान विद्यार्थ्यांसाठी रील्स मेकींग स्पर्धा घेण्यात आली.
यांनी केले सहकार्य
गरबा नाईट २०२६ या दांडीया उत्सवासाठी जनरल सेक्रेटरी उत्कर्ष भोसले, मासूम पटले, प्राची मोराळे, पियूष चिंचकर, ऋत्वीक भूजबळ, मृणाल टिबे, चेतन माळी, वैभव लटपटे यांनी सहकार्य केले.





