⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

जागतिक मूकबधिर दिवस – मूकबधिरांना सांत्वन नको स्वाभिमान हवा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२१ । प्रत्येक वर्षी 26 सप्टेंबर रोजी जागतिक मूकबधिर दिवस मानवाला जातो. परंतु आताच्या काळात जागतिक मूकबधिर सप्ताह म्हणून ओळखला जातो. जागतिक मूकबधिर संघ डब्ल्यूएफडी ने वर्ष 1958 पासून जागतिक बधिर दिवसाला सुरुवात केली. या दिवसांमध्ये मूकबधिर नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजनीतिक अअधिकारांच्या प्रति लोकांमध्ये जागृकता निर्माण करण्यासोबत समाजात आणि देशभरात त्यांची उपयोगीते बद्दल पण सांगितलं जातं

जागतिक मूकबधिर दिवसाचा उद्देश्य

मूकबधिर दिवससाचा उद्देश असा आहे की हा एक आठवड्याभरात मनवला जातो व मूकबधिर ग्रस्त नागरिकांचे जीवन स्वस्त, स्वाभिमान राहील व  याचा एक उद्देश सर्वसाधारण जनता व संबंधित मूकबधिर यांची क्षमता आणि उपलब्धी इत्यादी कार्यांकडे लक्ष आकर्षण करण्यासाठी केला जातो यामध्ये मूकबधिर नागरिकांनी केलेले कार्य प्रदर्शित केले जातात.

आता जरी चिन्ह भाषा हजारो वर्षांपासून अस्तित्वात असली तरी आज पण साधारण लोकांनी या भाषेत संभाषण करणे म्हणजे एक आव्हानच आहे या भाषेचे अध्ययन किंवा अध्यापन दोघं येणं गरजेचं असतं ज्यामुळे बधिर व्यक्तीची संस्कृती समस्या इत्यादी  संभाषणामध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात.

जागतिक मूकबधिर सप्ताह
सर्वप्रथम सर्वांनी एका गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे की हा दिवस मूकबधिर नागरिकांना सांत्वन देण्यासाठी नाही तर त्यांच्या जीवनात एक परिवर्तन घडवून आणण्यासाठी मनवला जातो.

मूकबधिर असणं कोणत्याही प्रकारच अपंगत्व किंवा कमजोरी नाही. ऐकण्याची क्षमता कमी असलेले लोक व्यवस्थित क्षमता असलेल्या लोकांपेक्षा बुद्धिमान असतात बस फरक इतकाच असतो की दोघांच्या संभाषणाचे माध्यम वेगळे असतात.

मूकबधिर नागरिकांच ज्ञान वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप किंवा सभा आयोजित केले जाऊ शकतात ज्यामध्ये यांच्याद्वारे प्रयोग केली गेलेली भाषा साधारण नागरिकांना पण सांगता येऊ शकते.