---Advertisement---
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात आरोग्यसेवेत लिंग समानतेवर कार्यशाळेचे आयोजन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२५ । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आरोग्यसेवेत लिंग समानता या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे शनिवार दि ८ मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे.

dr ulhas patil hospital

अंतर्गत गुणवत्ता हमी समिती (आयक्युएसी)व गोदावरी फाउंडेशनचे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या सयुक्‍त विद्यमाने आयोजीत या कार्यशाळेत महिलांच्या आरोग्यासाठी तसेच लिंगभेद नष्ट करण्याच्या उद्देशाने विविध तज्ज्ञ आपले विचार मांडणार आहे. कार्यशाळेची सुरुवात सकाळी ९ वाजता डॉ. एन. एस. आर्विकर यांनी महिला सक्षमीकरण: कायदेशीर आणि इतर पैलू, डॉ. योगिता बावस्कर जीवनशैली औषध, डॉ. गजानन पाटील लॅप्रोस्कोपीद्वारे महिलांच्या आरोग्याची प्रगती या विषयावर चर्चा करत स्त्रीरोग शस्त्रक्रियेत झालेल्या नवीन संशोधनांवर डॉ. सचिन सोलंके आरोग्य सेवेतील लिंगभेद एक डॉक्टर दृष्टिकोन मांडत आरोग्यसेवेत महिलांसमोर येणार्‍या अडचणी व त्यावरील उपाय लंच ब्रेकनंतर कार्यशाळेचा दुसरा टप्पा सुरू होणार असून डॉ. सी. ए. कांते सावलीपासून प्रकाशझोतात ती खूप तेजस्वीपणे चमकते,डॉ. सी. डी. सारंग यांनी सामान्य महिला आरोग्य समस्या तर कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात डॉ. माया आर्विकर महिलेचे आरोग्य: एक आढावा या विषयावर माहिती देणार आहे. सायंकाळी ५ वा कार्यशाळेचा समारोप करण्यात येणार आहे.कार्यशाळेत सहभाग नोंदवणा—या तज्ज्ञांना महाराष्ट्र वैद्यकि य परिषदेचे २ क्रेडीट पाँईट देखिल मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त तज्ज्ञांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन रूग्णालयातर्फै करण्यात आले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment