⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

आसाेदा रेल्वे पुलाच्या कामाला मिळणार गती

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । येथील रिंगराेड-शिवाजीनगरला जाेडणाऱ्या भाेईटे पुलाचे काम दाेन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. पिअर्सच्या खाेदकामासाठी लागणारे दुसरे पायलिंग आठ दिवसांत येणार हाेते मात्र ते दाेन महिन्यांनी शहरात दाखल झाले. दाेन मशीन झाल्याने आता कामाला गती येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. असाेदा रेल्वे गेटवरील पुलाच्या कामाला दाेन दिवसांत सुरुवात हाेणार आहे.

भाेईटेनगर (पिंप्राळा) पुलाचा श्रीगणेशा ११ फेब्रुवारी राेजी करण्यात आला झाला. पुलाच्या पिअर्ससाठी लागणारे एकच पायलिंग मशीन हाेते. तेही आठच दिवसांत नादुरुस्त झाल्याने वर्षभरात काम पूर्ण करावयाचे असल्याने कामाला विलंब हाेऊ नये, यासाठी आणखी दाेन पायलिंग मशीन मागवण्यात आल्या होत्या; परंतु ते तब्बल दाेन महिन्यांनी शहरात दाखल झाल्या.

त्यामुळे आता या कामांना अधिक गती मिळण्याचे संकेत दिसून येत आहेत. दरम्यान पिंप्राळा पुलासाेबतच मक्तेदार कंपनीला आसाेदा रेल्वे गेटवरील पुलाचा मक्ता देण्यात आलेला आहे. काम दाेन दिवसांत सुरू होणार असल्याचे महारेलचे समन्वयक संजय बिराजदार यांनी सांगितले.