एरंडोल येथे पुजाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या

जून 11, 2021 9:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२१ । एरंडोल येथील देशपांडे गल्लीतील विठ्ठल मंदीराच्या पुजाऱ्याची पत्नी ज्योती दत्ताञय भागवत यांनी (विठ्ठलवाडी) विठ्ठल मंदीरात छतास दोर अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ११ जून रोजी दुपारी १:४५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

erandol crime

एरंडोल पोलिस स्टेशन सूञांकडून मिळालेली माहीती अशी की, एरंडोल येथील देशपांडे गल्लीतील विठ्ठलवाडी मंदीराचे अर्चक दत्ताञय केशव भागवत व त्यांच्या पत्नी ज्योती भागवत हे दाम्पत्य मंदीरास लागून असलेल्या खोल्यांमध्ये वास्तव्यास होते. दरम्यान, आज ११जून रोजी दत्ताञय भागवत हे सकाळी १० वाजेपासून कासोदा येथे खाजगी कामानिनित्त गेले होते. दुपारी १:४५वाजता ते परत आले असता मंदीर बंद आढळून आले. म्हणून त्यांनी ज्योती यांना कॉल केला असता कॉल उचलण्यात आला नाही. मंदीराच्या आजुबाजूला शोध घेत विचारपूस करण्यात आली तरीसूध्दा त्या दिसून आल्या नाहीत.

भागवत यांच्या सोबत असलेला योगेश देशपांडे हा मंदीराच्या वर चढून मंदीरात खाली उतरला तेव्हा ज्योती ह्या मंदीरास असलेल्या छताच्या कडीला सूताच्या दोरीने गळफास लावून वर लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्या तेव्हा योगेश देशपांडे याने मंदीराचा दरवाजा उघडून जोरात किंकाळी मारली तेव्हा दत्ताञय भागवत व परीसरातील लोकांनी ज्योती भागवत यांचा मृतदेह खाली उतरवला व खाजगी वाहनाने ग्रामीण रूग्णालयात नेला असता डॉक्टरांनी ज्योती यांना मृत घोषित केले.

याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम पाटील, पंकज पाटील, संदीप सातपुते व अकील मुजावर हे करीत आहेत. आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now