जळगावात तुळजाई नगरात महिलेचा निर्घुण खून

ऑगस्ट 27, 2021 11:34 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२१ । शहरातील परिसरात असलेल्या रामेश्वर कॉलनीतील तुळजाई नगरात एका महिलेचा गळा चिरून आणि चेहऱ्यावर जबरी हल्ला करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील चौकशी सुरू आहे.

crime

तुळजाई नगरात राहणाऱ्या वंदना गोरख पाटील वय-४२ या महिलेचा गळा आवळून आणि चेहऱ्यावर काहीतरी वस्तूने मारहाण करून खून करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला आहे. घटनास्थळी एमआयडीसी पोलिसांनी धाव घेतली असून तपास सुरु आहे.

मयत महिला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होती. महिलेचा खून कशासाठी झाला हे अद्याप समजून आलेले नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now