माणिकराव कोकाटेंचा झाला गेम! येत्या सोमवारी देणार राजीनामा?

जुलै 25, 2025 6:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२५ । ऑनलाइन रमी खेळतानाची चित्रफीत व्हायरल झाल्यापासून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विरोधकांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यातच या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

manikrao kokate

दरम्यान आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जवळपास निश्चित झाला असून, ते सोमवारी राजीनामा देण्याची शक्यता आहे, मंगळवारी कॅबिनेटची बैठक आहे, त्यापूर्वी माणिकराव कोकाटे राजीनामा देण्याची शक्यता आहे.

आज देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये 25 मिनिटं चर्चा झाली, ही चर्चा वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्या संदर्भात होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे, मात्र या चर्चेबाबत अद्याप कोणतीही अधिक माहिती समोर आलेली नाहीये. फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now