Sunday, December 4, 2022

किराणा भरून द्या सांगितल्याने पत्नीला मारहाण

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२२ । आज तुम्ही कामाला नेले नाही, किराणा भरून द्या असे सांगितल्याचे राग आल्याने पत्नीला चापटाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना साकेगाव येथे घडलीय. या प्रकरणी पीडितेने भुसावळ तालुका पोलिसांत तक्रार दिली आहे.

- Advertisement -

भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे पती-पत्नी वास्तव्यास आहे. दि. ९ रोजी सायंकाळी ७.०० वाजेच्या सुमारास पत्नी तिच्या पतीला आज तुम्ही कामाला नेले नाही, किराणा भरून द्या असे सांगितले म्हणून आरोपी पतीने पत्नीला चापटाबुक्यांनी व बाबुळच्या काठींनी मारहाण करून दुखापत केले. या प्रकरणी पीडितेने भुसावळ तालुका पोलिसात फिर्यादी दिली. त्यानुसार आरोपी पती विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोहेकॉ वाल्मिक सोनवणे करीत आहे.

- Advertisement -
[adinserter block="2"]