⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | …तरीही लोकप्रतिनिधी व विविध संघटना गप्प का?

…तरीही लोकप्रतिनिधी व विविध संघटना गप्प का?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल शहरात पाईप लाईन दुरुस्ती साठी खड्डे खोदून ठेवले आहे. ते तात्काळ बुजविण्याची गरज असताना अद्याप बुजविले गेले नसल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. तसेच प्रत्येक प्रभागात अनेक ठिकाणी रस्ते साफसफाई आणि गटारी साफसफाई करण्यासह ओला व सुका कचरा वाहतूकमध्ये होणाऱ्या प्रक्रियेत मोठा घोळ सुरू असताना लोक प्रतिनिधी व विविध संघटना गप्प असल्याने नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. यामुळ नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

यावल नगरपरिषदेतर्फे पूर्वेकडील विकसित भागात पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकामासह नवीन पाईप लाईन टाकण्यात आली. ही कोट्यावधीची कामे करताना संबंधित यंत्रणेने सोयीनुसार ठेकेदाराच्या नावाखाली टक्केवारी हडप केल्याने ठेकेदाराने त्याच्या सोयीनुसार आणि मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे काम न केल्यामुळे विकसित भागातील नागरिकांना पाणी पुरवठा होण्यास अडथळा निर्माण झाला. त्यामुळे पुन्हा संबंधित ठेकेदार जागो जागी खड्डे खोदून पुन्हा पाईप लाईन दुरुस्तीचे काम करीत आहे. ही कामे करताना भर रस्त्यावर पुन्हा खड्डे खोदण्यात येत आहे. खड्डे खोदल्यानंतर आठ ते पंधरा दिवस पाईप लाईन व्हाल दुरुस्तीचे काम होत नसल्याने रहदारी करणाऱ्या नागरिकांना. वाहनधारकांना, रहिवाशांना मोठा अडथळा निर्माण होऊन त्रास सहन करावा लागत आहे. तरीही लोक प्रतिनिधी व विविध संघटना गप्प असल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत असून यावल नगरपालिकेच्या आर्थिक भोंगळ, बोगस कारभारास जबाबदार कोण? असे प्रश्ननही उपस्थित होत आहे. तसेच यावल नगरपालिका मुख्याधिकारी मनोज म्हसे, बांधकाम शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग प्रमुख यांचे पाईप लाईन ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांवर नियंत्रण आहे का? अशी चर्चा नागरिकांमध्ये शहरात चौकाचौकात सुरू आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह