जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२५ । आज म्हणजेच २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणेश चतुर्थी साजरी जात असून आज घराघरात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात रस्ते, गल्लीबोळ आणि सोसायट्या दुमदुमल्या आहेत. अनंत चतुर्दशी (६ सप्टेंबर) रोजी गणपती विसर्जनाने संपेल. हा दहा दिवसांचा उत्सव विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणेश पूजा कधी करावी? शुभ मुहूर्त काय आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया…

पंचांगानुसार यंदा भगवान गणपती बाप्पाच्या मध्यान्ह पूजेचा शुभ मुहूर्त आज बुधवार सकाळी ११.०५ वाजेपासून ते दुपारी १.४० वाजेदरम्यान असणार आहे. आगमनासाठी चतुर्थी प्रारंभ दुपारी ०१.५४ ते बुधवार, २७ रोजी दुपारी ०३.४३ वाजेपर्यंत.

गणपतीच्या पूजेचे साहित्य
हळदकुंकू, गुलाल, रांगोळी, फुले, दुर्वा, तुळशी, बेल, विड्याची पाने 15, गूळ, खोबरे, पंचामृत (दूध, दही, तूप,मध, साखर, शेंदूर, गंध, जानवे, कापसाची वस्त्रे (गणरायासाठी लाल रंगाची), कापूर, उदबत्ती, श्रीफळ, खारीक, बदाम, फळे, सुटी नाणी पाच रुपयांची दक्षिणा
गणपती विसर्जन कधी आहे?
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांनंतर भाविक गणपती बाप्पाला निरोप देतात. बाप्पाची विधीवत पूजा केल्यानंतर बाप्पाचे विसर्जन केले जाते. पंचांगानुसार यंदा गणपती विसर्जन 6 सप्टेंबर रोजी आहे.












