⁠ 
मंगळवार, ऑक्टोबर 8, 2024
Home | राजकारण | महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे अजित पवारांची एकूण संपत्ती किती? घ्या जाणून..

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे अजित पवारांची एकूण संपत्ती किती? घ्या जाणून..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२३ । महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी मोठी घडामोड पाहायाला मिळाली असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडखोरी करून शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. रविवारी अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

अजित पवारांची एकूण संपत्ती किती?

महाराष्ट्राच्या राजकारणात दुसऱ्यांदा खळबळ उडवून देणारे अजित पवारांची एकूण संपत्ती किती आहे? हे आपण जाणून घेणार आहोत. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत अजित पवार यांनी शपथपत्र दिले होते. त्यानुसार महाराष्ट्राच्या नव्या उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती 105 कोटी आहे. उमेदवारी अर्ज भरताना खुद्द अजित पवार यांनी ही माहिती दिली. याशिवाय त्यांच्याकडे 3 कार, 4 ट्रॉली आणि 2 ट्रॅक्टर आहेत. अजितच्या पत्नीकडेही अनेक आलिशान गाड्या आहेत.

पत्नीही करोडोंची मालकिन आहे

प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या पत्नीकडे होंडा एकॉर्ड, होंडा सीआरव्ही, इनोव्हा क्रिस्टा, एक मोटरसायकल, एक ट्रॅक्टर आणि टोयोटा कॅम्ब्रे आहे. अजितकडे सुमारे 13 लाख 90 हजार किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आहेत, तर पत्नीकडे सुमारे 61 लाख 56 हजारांचे दागिने आहेत. अजित पवार यांच्याकडेही अनेक एकर जमीन आहे, ज्याची एकूण किंमत 50 कोटी रुपये आहे.

अजित पवारांसोबत या आमदारांनी घेतली शपथ
दरम्यान, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांच्यासह आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव आत्राम, आदित्य तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल पाटील यांच्या नावांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांची अजित पवार ५ जुलैला बैठक घेणार आहेत. या बैठकीला अजित पवार यांच्यासह सुमारे ४२ आमदार उपस्थित राहू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.