⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | विशेष | हलाल आणि झटका मांस म्हणजे काय?

हलाल आणि झटका मांस म्हणजे काय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । मानवजातीमध्ये जेवणाच्या बाबतीत दोन गट येतात एक म्हणजे शुद्ध शाकाहारी आणि दुसरा गट म्हणजे मांसाहारी. मांसाहारामध्ये देखील दोन प्रकार येतात.. एक म्हणजे हलाल पद्धत तर दुसरी म्हणजे झटका पद्धत.. हलाल आणि झटका विषयावरून दरवर्षी देशभरात काहीतरी वाद होत असतो. मांसाहार करणारे काही नागरिक हलाल पद्धतीचे मांस खातात तर काही नागरिक झटका पद्धतीचे मांस खाणे पसंत करतात. आज आम्ही आपल्याला हलाल आणि झटका यातील फरक सांगणार आहोत.

‘हलाल’मध्ये अशी करतात कत्तल..

हलाल हा अरबी शब्द आहे. हलाल हे कुराणमध्ये सांगितल्याप्रमाणे, प्राण्यांची कत्तल करण्याचा हा एक प्रकार आहे. या पद्धतीमध्ये प्राण्याला गळ्याजवळ चाकूने चिरले जाते आणि संपूर्ण रक्त वाहू दिले जाते. गळ्याजवळ मुख्य धमनी कापल्याने जोपर्यंत हृदय धडकत असते तोपर्यंत रक्त बाहेर येते आणि हळूहळू तडफडून तडफडून प्राण्याचा जीव जातो. प्राणी निर्जीव झाल्यावर त्याचे मांस कापले जाते. या पद्धतीत कत्तल केला गेलेला प्राणी फारच घाबरलेला असतो. गळ्यावर चाकू फिरवताना मुस्लिम लोक बिस्मिल्ला अस म्हणतात याचा अर्थ अल्लाहच्या नावाने असा होतो. सर्व मुस्लिम लोक अश्या प्रकारचे हलाल केलेलं मांस खातात. एखाद्या प्राण्याच्या शरीरातील अशुद्ध रक्त निघून जावे असा त्यामागील उद्देश असतो.

आता जाणून घेऊ झटका पद्धतीबद्दल..

हलाल पद्धतीच्या अगदी विरुद्ध पद्धत हिंदू आणि शीख धर्मात आहे. या पद्धतीला झटका पद्धत असे म्हणतात. झटका पद्धतीत धारदार शस्त्राच्या एकाच घावात प्राण्याला ठार केले जाते. जुन्या जाणत्यांच्या माहितीनुसार एका घावात जीव घेतल्याने प्राणी घाबरून किंवा तडफडून न मरता एकाच क्षणात मरतो. त्यानंतर त्या प्राण्याचे मांस म्हणून खाण्यासाठी वापरण्यात येते. जुन्या शास्त्रानुसार फक्त झटका मांस मनुष्याच्या खाण्यायोग्य आहे असं सांगितले गेले होते. शक्यतो बळी देणे म्हणजे एका घावात प्राण्याला ठार करणे असे आहे. पूर्वी अश्या बळी देण्याच्या प्रथा फार अस्तित्वात होत्या. तसेच आता देखील गोंधळ, मानता, नवस यावेळी देखील प्राण्याचा बळी देऊन पुढील कार्याला सुरवात केली जाते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह