⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | वाणिज्य | GST कौन्सिलच्या बैठकीनंतर काय स्वस्त आणि काय महागलं? तपासून घ्या..

GST कौन्सिलच्या बैठकीनंतर काय स्वस्त आणि काय महागलं? तपासून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२३ । जीएसटी कौन्सिलची बैठक पार पडली असून यात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहे. ज्यामध्ये ऑनलाइन गेमिंगला GST अंतर्गत सामील करण्यात आले असून २८% कर लागू करण्यात आला. त्याच वेळी, परिषदेने कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या डिनुटक्सिमॅब औषध आणि दुर्मिळ आजारांच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या विशेष औषधी अन्न उत्पादनाच्या (FMCG) आयातीवर जीएसटीमधून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊया GST मधून कुठे दिलासा आणि काय महाग झाले?

काय स्वस्त झालं?
जीएसटी परिषदेने कर्करोगविरोधी औषधे, दुर्मिळ आजारांवरील औषधांना जीएसटी करातून सूट दिलीखाजगी ऑपरेटर्सच्या GST उपग्रह प्रक्षेपण सेवेला सूट दिल्याने उपग्रह सेवा प्रक्षेपण देखील स्वस्त झाले आहेत.
न शिजवलेल्या आणि न तळलेल्या स्नॅकच्या गोळ्यांवरील जीएसटी १८% वरून ५% वर कमी करण्यात आला आहे
सिनेमागृहांमध्ये आता खाणं-पिणं स्वस्त होणार आहे. सिनेमागृहांमध्ये दिल्या जाणाऱ्या खाण्यापिण्यावर १८% करऐवजी ५% कर आकारला जाईल.फिश पेस्टवरील जीएसटी १८% वरून ५ टक्के करण्यात आला आहे.
कृत्रिम जरीच्या धाग्यावरील जीएसटी १२% वरून ५% कमी झाला आहे

काय महागलं?
ऑनलाइन गेमिंग, कसिनो आणि घोड्यांची शर्यत महाग होईल कारण यावर आता २८% जीएसटी कर आकारला जाणार आहे. त्याच वेळी, जीएसटी परिषदेने मल्टी युटिलिटी आणि क्रॉसओव्हर युटिलिटी (XUV) श्रेणीतील वाहनांवर 22 टक्के उपकर लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे आता अनेक वाहने महागणार आहेत. MUV वर २८% जीएसटीव्यतिरिक्त २२% भरपाई उपकर लागू केल्याने वाहने महाग होतील. यासाठी एसयूव्हीचे पॅरामीटर्स निश्चित करण्यात आले आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.