⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

शाळेच्या पहिल्याच दिवशी वाद्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२२ । कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळांमध्ये अखेर बुधवारी पहिली घंटा वाजली. मुलांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला, शिक्षकांनी ही शाळेमध्ये सजावट करून विद्यार्थ्यांचे वाद्यांच्या गजरात जंगी स्वागत केले. विविध शालेय साहित्यासह गोड खाऊ वाटप करण्यात आले. अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी मनापासून आनंद लुटला. शिक्षकांनी देखील विध्यार्थ्यांना चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

कोरोना महामारीनंतर बुधवारी शाळेचा पहिलाच दिवस होता, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर चांगलाच आनंद दिसून आला. तब्बल दिड वर्षानंतर शाळेत विद्यार्थ्यांचे आगमन झाल्यामुळे विध्यार्थ्यांसारखेच शिक्षकांमध्ये देखील आनंदाचा सूर उमटत होता, काही शिक्षाकांनी तर विद्यार्थ्यांसोबत मिसळून आनंद लुटला. काही पालक आपल्या पाल्यांना शाळेवर सोडायला आले असताना शाळेतील मित्र, मैत्रीणीना भेटून आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून काहींचे अश्रू अनावर झाले होते.

अनुभूती स्कूलमधील मुख्याधपकांसह सर्वच शिक्षिक शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत केले. शाळेत पहिल्या दिवसापासून हसत-खेळत शिकता यावे यासाठी अनुभूती स्कूलचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या समाजकल्याणाच्या विचारधारेतुन विविध शैक्षणिक उपक्रम शाळेतर्फे राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस कायम स्मरणात राहवा यासाठी भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन चे अध्यक्ष अशोक जैन यांच्या संकल्पनेतुन आजचा उपक्रम राबविण्यात आला. यशस्वीसासाठी शिक्षक शिक्षेतर इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.