⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

एसपी सर का स्वागत नही करोगो… जळगावात तरुणाचा खून, चौघे जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२२ । जळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून नुकतेच एम.राजकुमार यांनी पदभार स्वीकारला. पोलीस अधीक्षक जिल्ह्याची माहिती घेत नाही तोच आज दोन गटात झालेल्या वादात एकाचा खून झाला आहे. तांबापुरा परिसरात ही घटना घडली असून तिघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारांनी नवीन पोलीस अधिक्षकांचे जोरदार स्वागत केले आहे.

मयताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील सिकलकर वाडा भागात राहणाऱ्या संजयसिंग प्रदीपसिंग टाक वय-२० या तरुणाचा सोमवारी रात्री फटाके फोडण्यावरून वाद झाला होता. आमच्या घरात फटाके फोडू नये असा जाब विचारल्याने मोनूसिंग बावरी, सोनू सिंग बावरी, मोनसिंग बावरी यांच्यासोबत वाद झाला होता.

मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास संजयसिंग हा घराबाहेर क्रिकेटच्या गप्पा करीत असताना मोनूसिंग बावरी, सोनू सिंग बावरी, मोनसिंग बावरी यांनी त्याच्यावर चॉपरने हल्ला केला. संजयसिंग याला वाचविण्यासाठी त्याचे वडील प्रदीपसिंग टाक, भाऊ करणसिंग टाक, काका बलवंतसिंग टाक, गल्लीतील व्यक्ती बग्गासिंग टाक यांनी धाव घेतली असता त्यांच्यावर देखील हल्ला करण्यात आला. चौघे देखील जखमी झाले आहे.

घटनास्थळी दोन्ही गटाकडून जोरदार दगडफेक झाल्याची माहिती आहे. मयत आणि जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले असून मोठी गर्दी जमली आहे. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने परिसरातून दोघांना ताब्यात घेण्यात आले असून इतर संशयीत फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील हे ताफ्यासह दाखल झाले आहे. सोमवारी झालेल्या वादावर एमआयडीसी पोलिसांनी वेळीच दखल घेत कारवाई केली असती तर आजचा प्रकार घडला नसता असे परिसरातील नागरिक चर्चा करीत आहे. गुन्हेगारांनी नूतन पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांना जोरदार दिवाळी भेट दिली आहे.