महाराष्ट्रात यंदा हाडं गोठवणारी थंडी पडणार? हवामान खात्यानं दिला गंभीर इशारा

ऑक्टोबर 13, 2025 3:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । यंदाच्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अति पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले आहे. मागच्या काही दिवसापासून परतीच्या पावसानाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पण ऑक्टोबर हीटमुळे सध्या अंगातून घामाच्या धारा निघत आहे. मात्र La Nina च्या प्रभावामुळे यंदा कडाक्याची अन् हाडं गोठवणारी थंडी पडू शकते, असा अंदाज वर्तवला आहे.

Thandi jpg webp

दिवाळीनंतर राज्यात थंडीची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या पहाटे हवेत प्रचंड गारवा जाणवायला लागलाय. तर दुपारी कडाक्याचे ऊन पडलेले असते. La Nina तापमानात प्रचंड घट होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जातोय. त्यामुळेच यंदा तीव्र हिवाळा जाणवणार असे हवामान विभागाने सांगितले. दिल्लीसह उत्तर भारतात सध्या थंडीची चाहूल लागली आहे. राजधानीत कडाक्याची थंडी पडत आहे. काही दिवसांत थंडीची हीच लाट महाराष्ट्रातही येईल.

सध्या हिमाचल प्रदेश आणि पंजाब या दोन्ही ठिकाणी तापमानात घट झाली. मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात घट झाल्यामुळे ला निना परिस्थिती निर्माण झाली आहे, याचा परिणाम हवामानावर होईल, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. ऑक्टोबर अखेरनंतर ‘ला निना’चा प्रभाव सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिप्रमाणात थंडीचा अंदाज मांडण्यात येत आहे. आयएमडीचा अंदाज आहे की, काही दिवसात ला निना प्रभाव सुरू होईल. या थंडीची तीव्रता नेमकी किती असेल, याचा अंदाज नोव्हेंबरमध्येच येणार आहे. जर ला निना प्रभाव ऑक्टोबरमध्ये सक्रिय झाला तर डिसेंबर आणि जानेवारीत तापमान अति प्रमाणात कमी होऊ शकते.

ला निनामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात घट होते. त्यामुळे गारवा वाढतो. ला निना दरम्यान, पूर्वेकडील वारे (ENSO) समुद्राचे पाणी पश्चिमेकडे ढकलतात आणि समुद्राची पृष्ठभाग थंड करतात. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसात ला निनाचा प्रभाव सुरू होण्याच शक्यता आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच थंडीला सुरूवात होईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now