जळगाव शहर

वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे पाणवठा स्वछता अभियान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । नुकतेच श्री गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात साजरे झाले, शहरातील मेहरुण तलाव तसेच शहरास लागून असलेल्या काही पांणवठ्यांवर देखील मूर्ती विसर्जन करण्यात आले. यात प्रामुख्याने गिरणा काठ आणि मन्यारखेडा तलाव यांचा समावेश होता. पाणवठ्यावर नागरिक मोठ्या संख्येत विसर्जन करतात सोबतच निर्माल्य, जुने फोटो, कपडे आणि तत्सम साहित्य पाण्यात टाकले जाते. सर्व यंत्रणा मेहरुण तलाव येथे व्यस्त असतात, त्याचवेळी इतर पाणवठ्यावर जायला कुणी तयार नसते. दरम्यान, न्यजीव संरक्षण संस्थे तर्फे पाणवठा स्वछता अभियान राबवत मन्यारखेडा तलाव परिसरात स्वछता करण्यात आली.

वन्यजीव संरक्षण संस्थे तर्फे vjss चे स्वछता दूत आणि बाल सैनिक, राहुल सोनवणे यांच्या युवराज क्लासेस चे विद्यार्थी अश्या दुर्लक्षित पाणवठयावर जाऊन स्वच्छता मोहीम राबवित असतात, यावेळी देखील वन्यजीव संरक्षण संस्थे तर्फे पाणवठे स्वछता मोहीम राबविण्यात येत आहे. काल मन्यारखेडा तलाव परिसरात स्वछता करण्यात आली या मोहिमेत कुणाल ओतारी, निखिल सोनवणे, भूषण वाणी, जयेश शिरसाळे, पवन सोनवणे, आदित्य सपकाळे, रितेश ठाकूर, रितेश बारी, या विद्यार्थ्यांसह संस्था अध्यक्ष रवींद्र फालक, राहुल सोनवणे, प्रसाद सोनवणे यांनी सहभाग नोंदवला.

“मन्यारखेडा तलाव हा देखील उच्च दर्जाची जैविक विविधता लाभलेला जळगांव शहरास लागून असलेला महत्वाचा तलाव आहे पण नेहमीच दुर्लक्षित आहे, vjss तर्फे या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.आता शेळगाव बॅरेंज भागात मोहीम राबविण्यात येणार आहे ” – राहुल सोनवणे , वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव

Related Articles

Back to top button