जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । तालुक्यातील शिरसोली येथील एका १७ वर्षीय मुलीला बळजबरीने ओढत तिचा विनयभंग केल्याची घटना २०१४ मध्ये घडली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्यात जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात कामकाज झाले असता आरोपीला तीन वर्ष कैद आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच सदर दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिन्याचा साधा कारावास व सदर रक्कमेतून चार हजार रुपये पिडीतेला देणे असाही आदेश न्यायालयाने केला आहे. मुकेश भिल्ल असे आरोपीचे नाव आहे.
शिरसोली येथे दि.२३ सप्टेंबर २०१४ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शिरसोली ग्रामपंचायतींच्या शौचालयाजवळ आरोपी विश्वास भिल्ल याने पिडीतेस पाठीमागुन घट्ट पकडून गळयाची ओढणी ओढली, त्यामुळे सदर आरोपीचे हाताचे नख पिडीतेच्या गळयाला व छातीला लागले. म्हणून पिडीतेने आरोपीविरुध्द एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दिली व आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम ३५४–अ(१) (आय) (२) आणि लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षणाचा कायदा कलम ७ शिक्षेस पात्र कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
याकामी जिल्हा व सत्र न्या.एस.जी.ठुसे यांच्या न्यायालयात कामकाज झाले असता सरकारपक्षातर्फे सहा. सरकारी वकील वैशाली महाजन यांनी एकूण ८ साक्षीदार तपासले. त्या साक्षीदारांपैकी पिडीत मुलीचा जवाब, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक अशोक अहिरे व इतर साक्षीदार यांचा जबाब महत्वपूर्ण ठरला. संपूर्ण साक्षीपुराव्याअंती जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांनी आरोपीस लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षणाचा कायदा कलम ८ प्रमाणे दोषी धरुन तीन वर्ष कैदेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.
तसेच सदर दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिन्याचा साधा कारावास व सदर रक्कमेतून चार हजार रुपये पिडीतेला देण्याबाबत आदेश केला आहे. याकामी सरकारपक्षातर्फे सहा. सरकारी वकील वैशाली महाजन यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी तुषार मिस्तरी यांनी मदत केली.
हे देखील वाचा :
- प्रभू श्रीरामा, दररोज मिळणारे जनतेवरील प्रेम अखंड राहू दे…
- “गुलाब भू च मंत्री होणार !” – सर्व सामन्यांच्या भावना
- महायुतीचा वचननामा माझ्या विजयाला नक्कीच चालना देईल; अमोल चिमणराव पाटील
- महिलांना स्वावलंबी बनवून आत्मसन्मान मिळवून देणारी ‘लाडकी’ योजना
- गोदावरी अभियांत्रिकीत विभागीय स्तरावरील आविष्कार स्पर्धा संपन्न