⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

अगोदरच्या तुलनेत वॉटरग्रेसला द्यावे लागताय दुप्पट पैसे : माजी नगरसेवकाची धक्कादायक माहिती

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । जळगाव शहर महानगरपालिकेने सव्वा तीन वर्षांपूर्वी वॉटरग्रेस कंपनीला जळगाव शहराची साफसफाई करण्याचा ठेका दिला आहे. यामुळे सव्वा तीन वर्षांपासून जळगाव शहर महानगरपालिकेला तब्बल दुपटीहुन अधिकचे पैसे संबंधित ठेकेदाराला द्यावे लागत आहेत. अशी माहिती माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना दिली.

वॉटरग्रेस कंपनीला ठेका देण्याआधी महानगरपालिका एकाच ठेकेदाराला साफसफाईचा ठेका देत नव्हती. तर प्रभागनिहाय पद्धतीने हा ठेका दिला जात होता. यामुळे विविध ठेकेदार या ठिकाणी ठेके घेऊन शहराची साफसफाई करत असत. त्यावेळी एका प्रभागाला दोन नगरसेवक अशी पद्धत होती. 37 प्रभाग होते. ज्यामध्ये ७५ नगरसेवक कार्यरत होते. अशावेळी २० प्रभागांमध्ये संबंधित ठेकेदारांना स्वच्छतेचे काम दिले जात होते. तर इतर १७ प्रभागांमध्ये मनपाचे कर्मचारी कार्यरत होते.

तर दुसरीकडे आता पाहिला गेलो तर स्थिती काही बदललेली नाही. फक्त प्रभाग कमी झाले असून एका प्रभागामध्ये दोन नगरसेवकांची भर पडली आहे. म्हणजेच आता १९ प्रभाग आहेत. तर ७५ नगरसेवक आहेत.म्हणजेच एका प्रभागाला ४ नगरसेवक. अशावेळी कार्यक्षेत्रात कोणताही बदल झाला नाहीये. फक्त प्रभाग संख्या कमी झाली आहे. प्रति प्रभाग नगरसेवक वाढले आहेत. यात विशेष बाब म्हणजे जळगाव शहर महानगरपालिका तितक्याच कामासाठी दुपटीने पैसे वॉटरग्रेस कंपनीला अदा करत आहे.

वॉटरग्रेसकंपनीला ठेका मिळण्यासाठी १७ प्रभागामागे महानगरपालिका ६२ लाख रुपये दरमहा विविध ठेकेदारांना वाटून देत होती. आता वॉटरग्रेसच्या एकहाती आमालाखाली महानगरपालिका एकाच ठेकेदाराला जवळजवळ दीड कोटी रुपये देत आहे. यामुळे जर काम वाढलं नाहीये . शहराची स्वच्छता त्याचप्रमाणे होत आहे.लोकसंख्येत वाढ झाली नाहीये. तर दुपटीने पैसे संबंधित ठेकेदाराला दिले का जात आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.असे माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे म्हणाले.

पुढे बोलताना सोनवणे यांनी अजून एक धक्कादायक बाब निदर्शनास आणून दिली.ती म्हणजे धुळे महानगरपालिका आणि नाशिक महानगरपालिका आपल्या घंटा गाड्या जेव्हा ठेकेदारांना हस्तांतरित करतात अशावेळी संबंधित ठेकेदाराकडून दर किलोमीटर मागे ठराविक रक्कम घेतली जाते. मात्र जळगाव मनपा ती घेत नाही. ही डीपिआर मधील चूक असून यासाठी मनपा अधिकारी जबाबदार आहेत असे सोनवणे म्हणाले.

याच बरोबर वॉटरग्रेस कंपनीला ठेका देण्याआधी सर्व ठेकेदारांना स्वतःचे वाहन हे कचरा उचलायला लागत होते. मात्र आता हे होत नाही. आता वॉटरग्रेसला फुकटात जवळ जवळ २५ कोटींची वाहने मिळाली आहेत. याचबरोबर जमा झालेला कचरा मनपा विकत घेते आहे हि बाब नवलच असून मनपा कचराच नाही तर माती दगड गोटे मिश्रीत कचरा विकत घेत आहे असेही ते म्हणले आणि यावर एकही लोकप्रतिनिधी बोलत नाही. असेही सोनवणे म्हणाले

WhatsApp Image 2022 11 14 at 4.26.44 PM
अगोदरच्या तुलनेत वॉटरग्रेसला द्यावे लागताय दुप्पट पैसे : माजी नगरसेवकाची धक्कादायक माहिती 1