ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात यावे : खा. रक्षा खडसे
जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । जिल्ह्यात सध्या चांगला पाऊस झालेला असुन त्यामुळे हतनूर धरणाचे काही दरवाजे उघडण्यात येऊन त्याद्वारे जास्तीचे पाणी सोडण्यात येते असून हे पाणी आत्ताच ओझरखेडा धरणात सोडण्यात असे खासदार रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री आमदार गिरीष महाजन यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
वरणगांव तळवेल उपसा सिंचन योजनेंतर्गत येणारे ओझरखेडा धरणाची पातळी ऑगस्ट – सप्टेंबर महिन्यात कमी होऊन शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते, सदर ओझरखेडा धरणाचे पाणी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रासाठी राखीव असल्याने सदर धरणाची पातळी कमी झाली असता, शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास अडचणी येत असुन त्यामुळे खुप त्रासाला सामोरे जावे लागते. सध्या चांगला पाऊस पडत असुन हतनूर धरणातून पाणी वाहून जात आहे. जर हतनूर धरणातून वाहून जाणारे पाणी आताच ओझरखेडा धरणात सोडण्यात आले तर, पुढील काळात धरणाची पातळी चांगली राहून धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पुरेशे पाणी मिळून अडचणी येणार नाहीत. असे करण देऊन खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सदर मागणी केली आहे.
हतनूर धरणातून ओझरखेडा धरणात पाणी सोडणे बाबत मागील वर्षी वेळोवेळी मागणी करून सुद्धा पाणी सोडण्यात आलेले नव्हते व शेवटी सप्टेंबर महिन्यात फक्त २ दिवसांनी सोडण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास झाला होता. तरी यावेळेस आत्ताच सदर पाणी सोडण्यात यावे असे खासदार खडसे यांनी आपल्या पत्रात नमुद केले आहे.