शौचालय योजनेत दिड कोटींचा अपहार, आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी

जुलै 26, 2022 2:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२२ । रावेर वैयक्तिक शौचालय योजनेत झालेल्या दिड कोटींच्या अपहार प्रकरणी दाखल गुन्ह्यानंतर १२ आरोपींना रावेर पोलिसांनी अटक केली होती. त्यात आजी-माजी अधिकार्‍यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता २८ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

raver jpg webp

आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी

रावेर न्यायालयाने सहा गटविकास अधिकारी दीपक संदानशीव, ग्रामपंचायतीचे तत्कालीन विस्तार अधिकारी दिनकर सोनवणे यांना न्यायालयाने पुन्हा २८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अन्य दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने संशयीतांना जळगाव कारागृहात रवाना करण्यात आले. तपास सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now