⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | गुन्हे | लाच भोवली! सरपंचासह पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यात

लाच भोवली! सरपंचासह पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा लाचखोरीच्या घटना समोर आलीय. घरकुलासाठी जागा नावावर करून देण्याकरिता पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील सरपंचाने १० हजाराची लाच मागितली. ती लाच स्वीकारताना खाजगी इसमाला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केल्याने खळबळ उडाली. अनिल विश्राम पाटील (वय ४६ वर्षे) असं सरपंचाचे नाव असून बलराम हेमराज भिल (वय ४६ वर्षे) असं खाजगी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमका प्रकार?
तक्रारदार हे पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक गावातील रहिवासी असून त्यांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले असून तक्रारदार राहत असलेली जागा ही त्यांच्या नावावर नव्हती. त्यांच्या नावावर गाव नमुना आठ अ मध्ये नाव लावण्यासाठीचे काम ग्रामसेवक यांच्याकडून करून घेण्याच्या मोबदल्यात सरपंच अनिल पाटील यांनी शुक्रवार दि. २७ रोजी १० हजार रुपयांची लाच मागणी केल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली व पडताळणी करण्यात आली.

शुक्रवारी दि. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी खाजगी इसमाकडे लाच देण्याचे सरपंचांनी सांगितल्यानंतर खाजगी इसम बलराम भिल याला लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. दोघांना अटक करण्यात आली व पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई?
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, दिनेशसिंग पाटील, राकेश दुसाने तसेच पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, हवालदार रवींद्र घुगे, सुनील वानखेडे, शैला धनगर, किशोर महाजन, बाळू मराठे, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.