जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२५ । जळगाव जिल्ह्यात सध्या उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहे. तापमानाचा पारा चाळीशीच्या दिशेने जात असून जिल्हावासीय आतापासूनच वाढत्या उष्णतेने हैराण झाले आहेत. एकीकडे उन्हाचे चटके बसत असताना दुसरीकडे पाणी टंचाईची (Water shortage) चिंता सतावू लागते. परंतु गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा जळगाव जिल्ह्यातील जलसाठा समाधानकारक आहे.

गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ४७ टक्क्यांवर होता. मात्र यंदा ५५ टक्के जलसाठा आहे. मार्चच्या मध्यान्हातच गिरणा धरण ४४ टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे पुढच्या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत गिरणा धरणातील जलसाठा जपूनच वापरावा लागणार आहे.
गत हंगामात चांगला पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणे ओव्हरफ्लो झाली होती. २०२३ मध्ये जेमतेम पाऊस झाल्याने २०२४ च्या मार्च महिन्यात जिल्ह्यात केवळ ४७.३१ टक्के जलसाठा होता. यंदा मात्र हा साठा ५५.१३ टक्के इतका आहे. हतनूर आणि वाघूरमध्ये जलसाठा मोठ्या प्रमाणात आहे. २०२४ मध्ये मन्याड आणि शेळगाव बॅरेजमध्ये ५० टक्क्यांवर जलसाठा आहे.
दरम्यान, शेळगाव प्रकल्प नव्याने उभारण्यात आला आहे. सध्या या प्रकल्पात २३१६ द.ल.घ.फू. जलसाठा आहे. प्रकल्पाची स्थिती पडताळण्यासाठी आणि सिंचनसाठ्याच्या तपासणीसाठी या प्रकल्पातून निम्म्यावर पाणी आवर्तनाद्वारे सोडले जात आहे. त्यातून जळगाव, धरणगाव व चोपडा तालुक्यातील काही गावांना फायदा होणार आहे.
सध्या कोणत्या धरणात किती जलसाठा? (गेल्या वर्षीचा आणि चालू वर्षीचा )
हतनूर : २०२४- ७०.५९ टक्के …. २०२५- ६८.०४टक्के
गिरणा : २०२४ -३२.५२ टक्के …. २०२५- ४४.५८ टक्के
वाघूर : २०२४ -७९.०९ टक्के …. २०२५- ८४.९१ टक्के
सुकी : २०२४ -८१.२८ टक्के …. २०२५- ८६.०९ टक्के
अभोरा : २०२४ – ७७.९२ टक्के …. २०२५- ७९.८० टक्के
मंगरूळ : २०२४ – ६५.८८ टक्के …. २०२५- ५९.५४ टक्के
मोर : २०२४ – ७७.१४ टक्के …. २०२५- ७६.१८ टक्के
अग्नावती : २०२४ – १३.३५ टक्के…. २०२५- ४२.६५ टक्के
हिवरा : २०२४ – २३.६० टक्के…. २०२५- ४२.६५ टक्के
बहुळा : २०२४ – ४१.५५ टक्के…. २०२५- ५१.७८ टक्के
तोंडापूर : २०२४ – ६३.४७ टक्के…. २०२५- ५७.१८ टक्के
अंजनी : २०२४ – १८.६४ टक्के …. २०२५- ४७.४८ टक्के
गूळ : २०२४ – ७८.६८ टक्के …. २०२५- ७४.२१ टक्के
भोकरबारी : २०२४ – ०७.३६टक्के …. २०२५- १२.५६ टक्के
बोरी : २०२४ – ५९.७० टक्के…. २०२५- ३६.०० टक्के
मन्याड : २०२४ – ०० टक्के… २०२५- ५४.३८ टक्के
शेळगाव बॅरेज : २०२४ – ००टक्के…. २०२५- ५९.४४ टक्के