⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

मनपा प्रशासनाची वॉटर ग्रेसवर पुन्हा मेहेरबानी : अभिषेक पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२१ । वॉटरग्रेस कंपनीला याआधीच आपल्या कंगाल मनपाने मोठ्या उदार मनाचे होऊन वाहने विकत घेऊन दिलेले असताना त्यावर किरकोळ किंवा मोठ्या नुकसान किंवा रिपेअरचा खर्च हा वॉटरग्रेस ने करावा हे त्याच्या झालेल्या कारारनाम्यात स्पष्टपणे नमूद असताना देखील मनपाने तब्बल १२ लाखांचा खर्च वाहनांच्या दुरुस्तीवर केला आहे. मनपा पुन्हा पुन्हा वॉटरग्रेसवर मेहेरबानी का करते आहे असा प्रश्न राष्ट्रवादी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी उपस्थित केला आहे.

मनपाच्या दि.४ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीच्या संविदेत मुद्दा क्रमांक ८ मध्ये सदरील वाहनांच्या लोखंडी कप्पे सुधारण्यासाठी १३ हजार ९०० प्रमाणे ८५ गाड्याच्या दुरुस्ती साठी ११ लाख ८१ हजार ५०० रुपयांच्या खर्चास मंजुरी देऊन सदरील काम पूर्ण करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे,
१. सदरील वाहने आरोग्य विभागाने जीएम पोर्टलवरून खरेदी करीत असताना ही गोस्ट लक्षात कशी आली नाही ? (कप्पे कसे हवेत) २.दुरुस्तीचा खर्च हा वॉटरग्रेसकडून का घेतला गेला नाही? ३.जळगावकर यांनी भरलेल्या कराची अशीच उधळपट्टी चालणार का? ४.वॉटरग्रेसवर इतकी मेहरबानी का?

अश्या छोट्या छोट्या चोऱ्या करूनच यांचा पण आकडा मागील झालेल्या घोटाळ्यासारखा तर होणार नाही ना? ज्या-ज्या अधिकाऱ्यांची यास मूक संमती होती त्यांच्याकडून या रकमेची वसुली का करण्यात येऊ नये? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.