⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

वाह रे बहाद्दर महापालिका : निधी मंजूर मात्र कामच नाहीत

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२२ । जळगाव शहरातील सार्वधिरीक वाहतूक असणारा रास्ता म्हणजे बेंडाळे चाैक ते पांडे डेअरी रास्ता. मात्र या रस्ताच्या कामाची मुदत संपूनही रस्ता तयार झाला नाही. मुळात म्हणजे प्रशासनाने हा रस्ता व्हावा यासाठी प्रशासनाने कोणताही प्रयत्नहि केले नाही.

खड्ड्यांमुळे सुदृढ नागरिकांपेक्षाही रुग्णांना हाेणारा त्रास सहन न हाेणारा आहे. गेल्या वर्षभरात विविध याेजनांतून २३० कामांना मंजुरी मिळाली. निधीही उपलब्ध आहे; परंतु मक्तेदारांची कार्यक्षमता आणि प्रशासनातील उदासीनतेमुळे अजूनही ४५ टक्के कामे अपूर्णावस्थेत आहेत. तसेच सुमारे १० काेटींचा निधी मंजूर असलेल्या २५ विकास कामांचे नारळ वर्ष लाेटले तरी फुटलेले नाही .

दाेन दिवसांपूर्वीच माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना शहरातील रस्त्यांच्या कामांना गती देण्याची सूचना केली. कामे न करणाऱ्या मक्तेदारांवर थेट फाैजदारी कारवाई करण्याची सूचना केली. गेल्या वर्षभरात डीपीसीच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांसह विविध विकास कामांसाठी ६१ काेटींचा निधी मिळाला होता.

महापालिकेला नागरी दलितेतर वस्त्यात सुधारणा याेजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगराेत्थान अभियान, मनपा निधी, दलित वस्ती सुधारणा याेजना,आमदार निधी अशा पाच याेजनांमधून शहरात २३० कामे मंजूर आहेत. वर्षभरापासून या कामांसाठी निधी उपलब्ध आहे; परंतु वर्ष लाेटले तरी केवळ १२५ कामेच पूर्ण हाेऊ शकली. १७ कामांची मुदत संपली असून, काम सुरू आहे. अद्यापही २५ कामांना प्रारंभ झालेला नाही. चार कामे मनपाची ना-हरकत नसल्याने सुरू हाेऊ शकलेली नसल्याचे समाेर आले आहे.