रोटट्रॅक्ट क्लबची मातोश्री वृद्धाश्रमला भेट

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । रोटट्रॅक्ट क्लब ऑफआयअ‍म्आर’ने शनिवारी मातोश्री वृद्धाश्रम येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी क्लब तर्फे भेट म्हणून फळांची वाटप करण्यात आली. विशेष म्हणजे, वृद्धाश्रमात सगळ्या तरुणाईला जीवन कस जगाव हा मोलाचा संदेश मिळाला.

या प्रसंगी आयमार कॉलेजचे प्राध्यापक मानसी भंगाळे, नेहा ललवाणी, रोटट्रॅक्ट क्लबचे प्रेसिडेंट शिवानी चौधरी, व्हाईस प्रेसिडेंट बटू अग्रवाल, सेक्रेटरी सयाजी जाधव, जॉइंट सेक्रेटरी अक्षय जाधव, सर्वांगी शर्मा, वेदांत दुसाने, अक्षत बेंद्रे, मानसी जगताप, मेघना भोळे, पूनम महाजन, ध्रुवी मिस्त्री, उमेश देशमुख, सागर निकम, ऋषिका पाटील, काजल गिरासे, मानसी पाटील, भाविका मानकर, श्रेणिक फिसवारा, सौरभ माळी, पूजा बोंडे, चित्राली बोंडे, वैशाली पाटील, दिव्या बोरसे साक्षी माळी आदी उपस्थित होते.