जळगाव जिल्हाबातम्याराजकारण

जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांचा उबाठा गटाला जय महाराष्ट्र!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२४ । विधानसभा मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असतांना जळगाव शहरात उध्दव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख व माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. विष्णू भंगाळे यांच्यासोबत युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्याकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने शहरात महायुतीला मोठी ताकद मिळणार आहे. जर पक्षाचा जिल्हा प्रमुखच पक्षाचा राजीनामा देत असेल तर पक्षाने विचार करायला हवा, असा चिमटा भाजपाचे उमेदवार राजूमामा भोळे यांनी काढला आहे.

माजी महापौर विष्णू भंगाळे हे उबाठा गटाच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक चेहरा म्हणून ओळखले जातात. ते उबाठाचे विद्यमान जिल्हाप्रमुख देखील आहेत. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्या जळगाव दौऱ्यांदरम्यान त्यांच्या सभांच्या नियोजनाची जबाबदारी भंगाळे यांनी मोठ्या कुशलतेने सांभाळली होती.

विधानसभा निवडणुकीसाठी ते शहरातून उबाठा गटाचे उमेदवार राहू शकतात, अशी शक्यता देखील वर्तविण्यात येत होती. मात्र उबाठातर्फे जयश्री महाजन यांना तिकिट मिळाले. मध्यंतरीच्या काळात ते उबाठा गटाला जय महाराष्ट्र करतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र आता विधानसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या काही तासांवर येवून ठेपले असतांना त्यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button