जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२२ । विवाहितेचा सासरच्यांनी केलेल्या मानसिक छळानंतर पंच मंडळींपुढे बैठक सुरू असतानाच दोन गटातील शाब्दीक वाद धक्काबुक्कीवर पोहोचला. या घटनेत दोन्ही गटातील दोघे जखमी झाले. या प्रकरणी संशयीतांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला.
शाब्दीक वाद वाढल्याने हाणामारी
मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा येथे शनिवार, 30 रोजी शफी भोसले यांच्या हलखेडा शिवारातील शेतात दुपारी तीन वाजता दयाल भोसले यांच्या भगिणीस लालगोटा गावातील विशाल मजेलाल पवार यांच्याकडे दिल्यानंतर पवार कुटुंबीयांनी विवाहितेस एक वर्षभरापासून माहेरी पाठवून दिले होते. या संदर्भात मार्ग काढण्यासाठी पंच कमेटीची बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली. यावेळी दयाल भोसले यांची बहिण सासरच्यांकडून झालेल्या त्रासाबद्दल माहिती देत असताना दोघा गटांमध्ये शाब्दिक वाद हाणामारीवर पोहोचला.
एका गटाविरोधात दंगलीचा गुन्हा
या प्रकरणी दयाल जोगींदर भोसले यांच्या फिर्यादीवरून कुलदीप आदेश पवार, आदेश मजेलाल पवार, विशाल मजेलाल पवार, बलदीप विशाल पवार, रणजीत मजेलाल पवार, अनुराग मजेलाल पवार, लाले रणजीत पवार, अमित आदेश पवार, नंदूबाई विशाल पवार (लालगोटा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीतांनी लाठ्या-काठ्या व लोखंडी रॉडद्वारे मारहाण केल्याने फिर्यादीचे भाऊ शिवदत्त भोसले यास डोक्याला जखम झाली तर दयाल भोसले यांनाही मारहाण करण्यात आली.
दुसर्या गटाचीही तक्रार
दुसर्या गटातर्फे विशाल मजेलाल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्काबाई जोगींदर भोसले, जोगींदर राजवंती भोसले, शिवदत्त जोगींदर भोसले, दयाल जोगींदर भोसले, कन्हेय्या बापू भोसले, शिवकिशन जोगींदर भोसले (लालगोटा) दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाण तपास पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार श्रावण जवरे करीत आहेत.