जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत यावल येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था मतदारसंघातून विद्यमान संचालक गणेश नेहेते यांना पराभूत करून चार मतांनी विनोदकुमार पंडित पाटील यांनी विजय मिळविला आहे.


आज झालेल्या मतमोजणीत विनोद पाटील यांना २६ तर गणेश नेहेते यांना २२ मते मिळाली. यामुळे चार मतांनी विनोदकुमार पाटील यांनी विजय मिळवत जिल्हा बँकेत संचालक म्हणून एंट्री केली आहे.







