⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरींची संवेदनशीलता ; गोंडगावच्या पिडीत कुटुंबाला दिली बक्षिसाची रक्कम !

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२३ । भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील पिडीत कुटुंबीयांची कॅनडातील जागतिक पोलीस स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारे ट्रिपल महाराष्ट्र केसरी व डीवायएसपी विजय चौधरी यांनी नुकतीच सांत्वन भेट घेऊन बक्षिसाची रक्कम कुटुंबियांना दिली. त्यांनी आपल्यातील संवेदनशीलता दाखवून दिली आहे.

वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स २०२३ विनीपेग कॅनडा येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत १२५ ज्ञस वजन गटात स्वर्णपदक मिळून विश्वविजेता झालेले विजय चौधरी गोंडगाव नगरीत सर्व मित्र परिवारासह घटनास्थळी दाखल झाले होते.

त्यांनी सर्व घटना चांगल्या प्रकारे समजून घेतली व डीवायएसपी या पदावर असल्याने वरिष्ठांशी चर्चा करून निश्चितच या घटनेस सहभाग घेऊन गुन्हेगारास फाशीची शिक्षा होईलच यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली.

या भेटीत त्यांनी अलीकडेच कॅनडातील आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडलिस्ट बरोबर मिळालेले एक लाख रुपये मानधनाची रक्कम या कुटुंबाला मदत म्हणून दिली. त्याच ठिकाणाहून उज्वल निकम साहेबांशी फोनवर चर्चा करून या चिमुकलीची केस तुम्ही लढवा अशी विनंती केली,व चिमुकलीच्या वडिलांना धिर देत सांत्वन भेट घेतली व चिमुकलीच्या वडिलांकडूनच मेडल गळ्यात टाकून खर्‍या अर्थाने चिमुकलीला श्रद्धांजली अर्पण केली.