चितोडा येथून चोरट्यांनी लांबविले वाहन ; चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद

जळगाव लाईव्ह न्युज । ४ नोव्हेंबर २०२२ । यावल (Yawal) तालुक्यातील चितोडा (Chitoda) सातपुडा कृषी केंद्राजवळून चोरट्यांनी छोटा हत्ती गाडी लंबविली आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात (Yawal Police Station) अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चितोडा येथील प्रशांत निवृत्ती धांडे (२२) याची छोटा हत्ती (क्र. एमएच १९, एस ९८७५) ही गाडी चितोडा यावल रस्त्यावर असेलल्या सातपुडा कृषी केंद्र जवळ लावलेली होती. मात्र गुरुवारी रात्री २.३० च्या सुमारास चोरट्यांनी ही गाडी लांबविले आहे. त्यातील एकाने बनावट चावीने दरवाजा उघडून आत प्रवेश केला. नंतर वाहन घेऊन पसार झाले. चोरटे वाहन घेऊन यावलमार्गे चोपड्याच्या दिशेने निघाल्याचे दिसत आहे. हा प्रकार तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. दरम्यान प्रशांत धांडे हा युवक गाडी चालवून आपला उदरनिर्वाह करत होता. काही महिण्यापुर्वीच त्याने ही गाडी खरेदी केली होती.

याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात सध्या चोरट्यांनी हैदोस घातला आहे. दिवसेंदिवस घरफोडीसह वाहन चोरीच्या घटना वाढतच आहे. चोरट्यांना खाकी वर्दीचा सपशेल धाक राहिलेला नसल्याचे दिसून येतेय. यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पहा व्हिडिओ :