⁠ 
रविवार, मे 19, 2024

वेदांत प्रकल्प : एरंडोलला युवासेनेची निषेध स्वाक्षरी मोहीम!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

erandol news-जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळे दिड लाख कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन हा महत्त्वपूर्ण प्रकल्प गुजरातला पळविल्याच्या निषेधार्थ एरंडोल शहर युवासेनेच्या वतीने “स्वाक्षरी निषेध मोहीम” शहरातील महात्मा फुले चौक येथे राबविण्यात आली. सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने राज्याच्या विकासाच्या व रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प खेचून आणला होता. परंतु सध्याच्या शिंदे फडणवीस सरकारने हा प्रकल्प गुजरात कडे वळवला. राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षामुळे या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने कंपनीने महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुंडाळला. गुजरात सरकार पेक्षा जास्त सवलती तत्कालीन महाविकास आघाडी सरकार पुरविण्यास अनुकूल असताना देखील हा प्रकल्प गुजरातकडे गेल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. हिंदुत्वाच्या नावाने बंड करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वार्थ व सत्तेसाठी केवळ शिवसेनेचाच नाही तर महाराष्ट्रातल्या असंख्य तरुणांचा विश्वासघात केला असल्याची भावना व्यक्त होत आहे… या प्रकल्पामुळे जवळपास एक लाख तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार होती. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळातील रायगड मधील प्रस्तावित असलेला साडेतीन हजार कोटींचा “बल्क ड्रग्ज पार्क” प्रकल्पही गुजरात मध्ये वळविण्याची शक्यता असल्यामुळे तेथील ऐंशी हजार रोजगाराच्या संधी ला महाराष्ट्रातील तरुण मुकणार आहेत.

राज्यातील हे दोन महत्त्वपूर्ण प्रकल्प गुजरात कडे वळविण्यात येत असताना मुख्यमंत्री शिंदे गणेश मंडळांना भेटी देण्यात व्यस्त होते. शिंदे फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आहेत की गुजरातचे ? असा सवाल शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील यांनी यावेळी उपस्थित केला… पन्नास खोके घेऊन ओके झालेल्या या नाकर्ते सरकारचा निषेध असो अशा घोषणा उपस्थित युवासैनिकांनी दिल्या.

याप्रसंगी समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक डॉ.सुरेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष संजय महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र पाटील, माजी नगरसेवक रमेश माळी, माजी नगरसेवक नितीन बिर्ला, माजी नगरसेवक प्रमोद महाजन, माजी नगरसेवक राजेंद्र ठाकूर, शिवसेनेचे शहरप्रमुख कुणाल महाजन, उपशहरप्रमुख सुनील मराठे, युवासेनेचे शहरप्रमुख अतुल महाजन, संदीप पाटील, परेश बिर्ला, चंदू जोहरी, युवासेनेचे शहर समन्वयक अमोल भावसार, कुणाल पाटील, अनिल महाजन, नितीन महाजन, अजय महाजन, मोहन महाजन, ऋषी शिंपी, उत्तम शीरवानी, प्रदीप राजपूत, राजेश महाजन, सचिन महाजन, गोपाल महाजन, जितेंद्र महाजन, अमोल महाजन, स्वप्निल वाल्डे, प्रवीण महाजन, सुरेश महाजन, किशोर महाजन, नामदेव महाजन, संतोष माळी, नाना महाजन, बापू महाजन, आप्पा मिस्तरी आदी उपस्थित होते.