⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

मंगळग्रह मंदिरात शतचंडी निमित्त उद्यापासून विविध कार्यक्रम

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । अमळनेर येथील मंगळदेव ग्रह मंदिरात विश्वातील एकमेव श्री भूमीमातेची मूर्ती स्थापित झाली आहे. त्यानिमित्ताने या चैत्र मासातील नवरात्राच्या पार्श्वभूमीवर ९ रोजी पासून शतचंडी महापुजेस प्रारंभ होत आहे. ११ रोजी शतचंडी महापूजेची समाप्ती आहे. या तिन्ही दिवशी रोज वेगवेगळे ११ मानकरी सपत्नीक ही महापुजा करतील. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले मुख्य यजमान असतील. ख्यातनाम पुरोहित केशव पुराणिक मुख्य पुरोहित असतील. ११रोजी संतश्री प्रसाद महाराज यांच्या उपस्थितीत पूर्णाहुती होईल.

याचेच औचित्य साधून मंगळग्रह सेवा संस्थेने ११ रोजी विविध विकास कामांची उद्घाटने, मंदिराच्या तथा संस्थेच्या नव्या माहिती पुस्तिकेचे लोकार्पण, काही मान्यवरांचा सत्कार व पैलाड येथील पोलीस चौकीच्या नवनिर्माणाचे भूमिपूजन असे कार्यक्रम ठेवले आहेत. आमदार अनिल पाटील अध्यक्षस्थानी असतील. यावेळी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.