भुसावळ येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२२ । भुसावळ येथे प्रतिष्ठा महिला मंडळ व हिंदू जागरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान स्त्रीत्वाचा पुरस्कार वितरण तथा व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास खासदार रक्षा खडसे उपस्थित होत्या.
यावेळी खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते ‘राजमाता जिजाऊ व देवी अहिल्याबाई होळकर” यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालुन कार्यक्रमाची सुरवात आकरण्यात आली. तसेच उपस्थित प्रमुख पाहुण्याच्या हस्ते समाजामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार व गौरव करण्यात आला. या व्याख्यनास समीर दरेकर यांच्या “पणतीला जपतांना” सुरवात करण्यात आली.
यावेळी खासदार रक्षा खडसे, मुख्य वक्ते समीर दरेकर,रजनीताई सावकारे, संगीता बिजलानी,आरती चौधरी, रश्मी शर्मा, लता सोनवणे, पद्मजा दरगड, अनिता आंबेकर, सुनंदा भारुळे, मनीषा काकडे, श्रद्धा चौधरी, आभा दरगड, जयश्री चौधरी, सुनिधी सावकारे, दिशा महाजन, सई पळसकर, राजश्री भोलाणे, आरोही गोयल, नुपूर भालेराव उपस्थित होते.