गुरूवार, जून 8, 2023

पोलिसांची मोठी कारवाई : ३ लाखाचा गुटखा झाला जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२३ ।  जळगाव गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे एका व्यावसायिकाकडून दोन लाख 95 हजारांचा गुटखा जप्त केल्याने गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील ओम शांती नगरातील नितीन सुरेशचंद सुराणा यांच्या घरातून सुमारे दोन लाख 95 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना गुटख्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर जळगावच्या पथकाने जामनेर शहरातील ओम शांती नगरातील नितीन सुराणा यांच्या घरावर छापा टाकला. यात घरात दोन लाख 95 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. याबाबत नितीन सुरेशचंद सुराणा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा उपनिरीक्षक अमोल देवडे, भगवान पाटील, नंदलाल पाटील, उपाली खरे व भारत पाटील यांच्या पथकाने केली आहे.